Sunday 25 September 2011

ब्लॉगचा १ महिना

प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
२५ ऑगस्ट २०११ रोजी मी हा ब्लॉग सुरू केला. आता बरोब्बर महिना झाला आहे. अवघ्या महिनाभराच्या अवधीत ब्लॉग व्हिजिटचा आकडा २८०० पेक्षा जास्त झाला आहे. हा मराठी ब्लॉग विश्वातील एक विक्रमच म्हणायला हवा. तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे हे शक्य झाले. या पुढेही आपण मला असाच प्रतिसाद द्याल, याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंकान नाही.. 
मी तुमच्यातीलच
मी लेखन करते म्हणून कोणी फार मोठी आहे, अशी माझी अजिबात समजूत नाही. मी तुमच्यातीलच एक आहे. फक्त मी जे काही वाचले ते आता नव्याने सांगत आहे. त्याचा बहुजन चळवळीला उपयोग होत आहे, हे माझे भाग्य एवढेच. तुम्हांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळेही हुरूप आला आणि लेखन घडत गेले. यापुढेही ते असेच सुरू राहू दे, अशी जिजाऊ चरणी प्रार्थना.
तुकारामांची प्रेरणा!
हे लेखन करीत असताना जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या ‘भेदाभेद भ्रम अमंगळङ्क ही अभंग पंक्ती माझ्या अंत:करणात ज्योतीसारखी सतत तेवत होती. त्यामुळै जिथे अमंगळ भेद दिसून आला तिथे मी प्रहार करू शकले. हे प्रहार करतानाही ‘नाठाळांच्या काठी हाणू माथाङ्क हे तुकारामांचे वचनच मला धीर देत गेले.
मला ऋणात राहू द्या 
असो. फार पाल्हाळ न लावता. हे हीतगुज संपवते. धन्यवाद म्हणून मी तुम्हा सर्वांच्या प्रेमाला उणेपणा आणू इच्छित नाही. आपली बहीण म्हणून आपल्या सर्वांच्या ऋणात राहणे मला अधिक आवडेल.
जय जिजाऊ, जय शिवराय.  

आपलीच लाडकी
अनिता पाटील, औरंगाबाद.

No comments:

Post a Comment