Wednesday 13 June 2012

संजय राऊत यांनी केला दिंडी सोहळ्याचा अवमान


सामनातून सोहळ्याची तुलना भ्रष्टाचाराशी 

संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची बदनामी करून संजय राऊत यांनी पुन्हा एकदा चाभरेपणा केला आहे. रायगडावरील ६ जूनच्या शिवराज्याभिषेक उत्सवास मांजरासारखे आडवे जाण्याचा प्रयत्न राऊत यांनी नुकताच केला. त्यावेळी ‘चाभरा चाटू संजय राऊत' हा लेख मी याच ब्लॉगवर लिहिला होता. अर्थात राऊतांसारखी काळी मांजरे आडवी गेली तरी राज्याभिषेक सोहळा थांबणार नव्हताच. तो मोठ्या थाटा माटात साजरा झाला. आता संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून वारकरी सांप्रदायावर दुगाण्या झाडल्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली आणि माऊलींची पालखी आणि सर्व संतांचा  दिंडी  सोहळा यांची तुलना भ्रष्टाचारी सुरेश कलमाडी यांच्याशी करून राऊत यांनी आपल्या अकलेचे दिवाळे वाजल्याचे महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. १२ जून २०१२ च्या सामनात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचा मथळा आहे : पुण्यातील कलमाडीची दिंडी.  कलमाडी आणि वारक-यांची दिन्डी यांचा अर्थाअर्थी तरी संबंध आहे का? तरीही कलमाडी यांच्या भ्रष्टाचाराच्या पापाला  दिंडीची उपमा देण्याचे महापाप राऊतांनी केले आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या इतर भावंडांना छळ करून जिवंत समाध्या घेण्यास भाग पाडले. ज्ञानेश्वरादि भावंडांच्या समाध्या म्हणचे ब्राह्मणांनी घडविलेले खूनच होते. ज्ञानेश्वरादि भावंडांनी ज्या वारकरी धर्माची पताका खांद्यावर घेतली होती, त्या धर्मातील समतेच्या विचारांचा खून ब्राह्मणांना साडेसातशे वर्षांत  करता आला नाही. जे ब्राह्मणांना जमले नाही, ते कार्य आता शिवसेना आणि संजय राऊत यांनी खांद्यावर घेतले आहे, असे दिसते.  दिंडी  सोहळ्याची भ्रष्टाचाराशी करण्यात आलेली तुलना हेच दर्शविते. 
संजय राऊत वारक-यांच्या विरोधात 
का आहेत, हा प्रश्न वाचकांना पडला असेलच. या मागे मराठा द्वेषाची मळमळ आहे. मराठा समाजाचे खच्चीकरण करण्यासाठी शिवसेनेची स्थापना झालेली आहे, हे सत्य एकदा लक्षात घेतले की, या प्रश्नाची उकल आपोआप होते. मराठा समाज वारकरी धर्माशी बांधलेला आहे. त्याचप्रमाणे मराठेतर बहुजन समाजही वारकरी धर्माशीच बांधलेला आहे. अशा प्रकारे वारकरी धर्माने महाराष्ट्रातील ब्राह्मणेतरांची मोठी एकजूट उभी केलेली आहे. मराठ्यांना कमजोर करायचे असेल, तर बहुजनांची एकजूट फोडली पाहिजे, यासाठी ब्राह्मण मंडळी सातत्याने प्रयत्न करीत आली आहे. वि. का. राजवाडे यांनी वारक-यांची ‘टाळकुटे' असे संबोधन वापरून अवहेलना केली होती. हीच परंपरा ठाकरे चालवित आहेत. ठाक-यांचे पाईक म्हणून संजय राऊतांना वारक-यांना ठोकणे भागच आहे. म्हणून सामनातून 
ही सगळी मळमळ
ओकली जात आहे. ‘कलमाडींची दिंडी'  या अग्रलेखातील काही 

1. एका बाजूला टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताका फडकवत माऊली नामाच्या जयघोषात ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू होते. ‘माझे जिवाची आवडी पंढरपुरा नेईल गुढी’ अशी अवस्था लाखो वारकर्‍यांची झाली होती. त्याचवेळी पुण्यातील समस्त कॉंग्रेसजन कलमाडींची गुढी, पालखी पुणे महानगरपालिकेत रेटून नेताना दिसत होते.

2.  पंढरपुरात जसे बडवे आहेत तसेच बडवे पुण्यातील कॉंग्रेसमध्ये आहेत व ते सर्व लोक कलमाडींना ‘माऊली’ मानतात. माऊलींचे पुण्यात आगमन झाल्यापासून ते राजकारणापासून अलिप्त होते. याच काळात राष्ट्रवादीचा जोर वाढला. 

3. ...माऊली म्हणजे चैतन्याचा झराच. 

4. कलमाडींची दिंडी, पताका कॉंग्रेसवाले पुढे नेत आहेत. त्यांचा जयघोष घुमू द्या. 

5. गाडगीळ श्‍वास मोकळा करा. तुमची पालखी उचलायला चार प्रामाणिक कार्यकर्ते पुण्यात उरले आहेत काय...  
अनिता पाटील
............................................

सामनाचा मूळ अग्रलेख येथे वाचा

No comments:

Post a Comment