Sunday 7 October 2012

भुईमुगाच्या शेंगा आणि रात्रभर सोडवलेल्या गणिताची खोटी गोष्ट

 - प्रा. रवींद्र तहकिक
--------------------------------------------------------------------------------------
 टिळक किती स्वाभिमानी होते आणि हा स्वाभिमान त्यांच्यात लहानपणा पासूनच
कसा रुजलेला होता हें पटवून देण्यासाठी कोणीतरी टिळकभक्ताने रचलेली भुईमुगाच्या
शेंगाची गोष्ट आपण थोडीजरी अक्कल आणि तर्क बुद्धी जागी ठेवून वाचली तरी ती
एक निव्वळ लोणकढी थाप आहे हें आपल्या लक्षात येयील.
  मुळात टिळकांच्या काळात आजच्या प्रमाणे शाळेत टिफिन घेऊन जाण्याची पद्धत
नव्हती. किंवा शाळेच्या बाहेर आजच्या प्रमाणे चणे-फुटाणे, पेरू, भुईमुगाच्या शेंगा ,
पाणीपुरी-चाट , इत्यादीच्या गाड्याही लागत नसायच्या . बरे काही मुलांनी दप्तराच्या
पिशवीत शेंगा लपवून आणल्या असे मानले तरी , त्या काळात इतकी कडक शिस्त
असे की पोरे वर्गात शेंगा खावूच शकत नाहीत .
   असे असताना समजा मुलांनी शेंगा खावून वर्गात टरफले  टाकली असतील आणि
मास्तरांनी त्याची शिक्षा म्हणून सर्वाना वर्ग साफ करायला सांगितला असेल तर
टिळकांनी ते काम करायला हवे होते ' ' मी शेंगा खाल्या नाहीत ,मी टरफले वेचणार नाही ' '
असे मास्तरला म्हणणे म्हणजे स्वाभिमान नव्हे तर उद्दाम पणा झाला. असे म्हणून
त्यांनी वर्गातल्या इतर मुलांना देखील गुरूंची आज्ञा भंग करण्यासाठी उधुक्त केले ,
दुसर्यांचा असा जाहीर पाणउतारा किंवा उपमर्द करण्यात टिळकांना मोठा आनंद
वाटत असे, हें त्यांच्या पुढील जीवनात देखील अनेकदा दिसून आले.

 रात्रभर सोडवलेले गणित

    टिळकांनी लहान पनी एकदा वडिलांनी सुपार्या विकायला पाठवले असताना
    २ आण्याचा हिशोब लागत नव्हता म्हणून रात्र भर जागून जेव्हा २ आण्याची
 खोट सापडली तेव्हाच अंथूरनाला पाठ टेकवली असा एक किस्सा सांगितला जातो
 हाच किस्सा थोडेफार तपशिलाचे फेरफार करून तेनालीरामा/ सावरकर /आर्या चाणक्य
रामदास / एकनाथ इत्यादी बाबतीत सांगितला जातो. मी तर एका पुस्तकात असा
किस्सा गोळवलकर गुरुजी संदर्भात देखील वाचला आहे
मुळात असे लहानपणीचे म्हणून सांगितले जाणारे मोठ्या माणसांचे किस्से
सत्यातेच्या बाबतीत विश्वासाहार्य नसतात .

No comments:

Post a Comment