Friday 13 December 2013

आदिलशहाचा मोकाशी दादू कोंडदेव कुलकर्णी

-श्रीमंत कोकाटे (शिवचरित्र अभ्यासक, संशोधक)


दादू कोंडदेवचे खरे नांव दादू कोंडदेव कुलकर्णी असे आहे. दादू कुलकर्णी हा आदीलशहाचा
मोकाशी म्हणजेच नोकर होता. तुकोबारायांना छळणारे हे दादू कुलकर्णीचे समर्थक होते. म्हणजे दादू
कुलकर्णी या शिवरायांचा शत्रू होता. शत्रू असणा-या देखील ब्राह्मणांनी गुरु केले. दादू कुलकर्णीचा
शिवचरित्राशी काहीही संबंध नाही. दादू कुलकर्णी हा युद्धकलेत अकुशल होता. शिवरायांना युद्धकलेचे
शिक्षण शहाजीराजांनी दिले, त्याचा सराव जिजाऊमाँसाहेबांनी घेतला. कान्होजी जेधे, येसाजी कंक,
मुंढव्याचे गायकवाड, तुपे, मोझे, पायगुडे इ. शहाजीराजांचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते आहेत. वीर
बाजी पासलकरांनी बाळ शिवबांना पुणे व परिसरात मोलाची मदत केली. ब्राह्मण गुरु असल्याशिवाय
कोणीही मोठे होत नाही हे बिंबविण्यासाठी ब्राह्मणांनी दादू कुलकर्णी शिवचरित्रात घुसविला.
शिवचरित्राच्या कोणत्याही संदर्भ साधनात दादू कुलकर्णीचा साधा उल्लेख देखील नाही.

दादुने केला तुकोबारायांचा छळ
संत तुकोबाराय हे शिवाजीराजांचे खरे गुरु आहेत याबाबत कोणाचेही दुमत नाही, पण
तुकोबारायांचे गुरुपण संपविण्यासाठी रामदास शिवचरित्रात घुसविला. त्यांच्या प्रबोधनामुळेच
शिवरायांचे मावळे प्रभावित झाले. राजांनी तुकोबारायांची अनेक किर्तने प्रत्यक्ष ऐकलेली होती. त्यांच्या
ख-या किर्तनामुळे भटशाही हादरली. त्यामुळे त्यांनी तुकोबारायांना त्रास देणे सुरु केले. त्यांची बदनामी
मंबाजी भट, रामेशरभट याने केली. त्यांच्या अभंगाची गाथा त्यांनी पाण्यात बुडवली. त्यांना शिक्षा
करावी अशी मागणी अशी मागणी देहूच्या दोन ब्राह्मणांनी आदिलशहाचा मोकाशी दादू कोंडदेव याचेकडे
केली. शेवटी त्यांची हत्या करुन ब्राह्मणांनी सदेह वैकुंठगमन असा अपप्रचार सुरु केला. (महापुरुषांची
हत्या झाली म्हणून त्यांच्या योग्यतेला तडा जात नाही. जगातील अनेक महापुरुषांच्या हत्या झालेल्या
आहेत म्हणून त्यांना जनतेने नाकरले नाही.) राज्याभिषेकप्रसंगी देखील ब्राह्मण शिवरायांशी उर्मटपणे
वागत होते. तेथे तुकोबारायांच्या हत्येप्रसंगी ब्राह्मणांची क्रुरता शिगेला पोहचली होती. शिवराय-
तुकोबाराय यांचे आंदोलन संपविण्यासाठी ब्राह्मणांनी मुस्लिमांना हाताशी धरलेले होते.
तुकोबारायांच्या हत्येनंतर पेशव्यांनी गाथा जाळली. त्यांचे अभंग म्हणण्यावर पेशव्यांनी बंदी
घातली. निरुपणासाठी जर कोणी अभंग म्हटले तर पेशवाईत शिक्षा केली जात असे. आजदेखील
ज्ञानेशरांच्या पालखीपुढे तुकोबारायांची आरती म्हणण्यास विरोध केला जातो. देहू आणि आळंदी
यांच्या विकासातील फरक प्रकर्षाने जाणवतो. आळंदीचे उदात्तीकरण तर देहू उपेक्षित ठेवण्यामागील
षडयंत्र कोणाचे? महाराष्ट्रात कोणताही नवीन पाहूणा आला की त्यांना आळंदीला नेले जाते पण देहूला
नेले जात नाही. म्हणजे तुकोबारायांना व शिवरायांना विरोध करणार एकच आहेत.

(शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकातून)


प्रख्यात इतिहास संशोधक आणि शिवचरित्राचे अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी लिहिलेले ‘शिवाजीराजांचे खरे शत्रू कोण?' हा ग्रंथ "अनिता पाटील विचार मंच"च्या वाचकांसाठी येथे उपलब्ध करून देत आहोत. जिज्ञासूंनी त्यावर प्रतिक्रिया जरूर द्याव्यात.

ग्रंथ प्रवेश 
भाग-१
भाग-४
  1. नेताजी पालकरांच्या धर्मांतराला विरोध, गंगाधर कुलकर्णीच्या धर्मांतराला मात्र समर्थन
  2. संभाजीराजांना मोगलांच्या ताब्यात देणारा विश्वासघातकी कवि कुलेश
  3. औरगजेबाने संभाजी राजांना मनुस्मृती संहितेप्रमाणे ठार मारले
  4. शिवशक बंद करुन मोगलांचा फसलीशक सुरु करणारे पेशवे
  5. शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
  6. शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे

No comments:

Post a Comment